। मुंबई । वृत्तसंस्था ।
संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आ.नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना तूर्तास अटक होणार नसून आता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.