। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलाच्या प्रक्रियेशी हार्दिक पांड्याचा संबंध नाही, त्यात त्याची काहीही चूक नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवू नये, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार आणि दिल्ली संघाचे संचालक सौरव गांगुली यांनी व्यक्त केले.
मुंबई संघाला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणार्या रोहित शर्माला दूर करून यंदा गुजरात संघातून घेण्यात आलेल्या हार्दिककडे कर्णधारपद देण्यात आले. हा बदल मुंबई संघाच्या पाठीराख्यांना पटलेला नाही. परिणामी, प्रत्येक सामन्यात त्याची हुर्यो उडवण्यात येत आहे. हार्दिकची अशाप्रकारे हुर्यो उडवणे योग्य नाही. संघ मालक कर्णधार निवडत असतो हे सर्वच लीग स्पर्धांत घडत असते. इतकेच नव्हे कोणत्याही खेळात कर्णधाराची नियुक्ती संबंधितांकडून केली जात असते, त्यामुळे एखादा असा बदल झाला तर तो स्वीकारायला हवा, असे गांगुली यांनी म्हटले.