• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागेना

Antara Parange by Antara Parange
November 30, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
दत्त मंदिरातील चोरीचा तपास लागेना
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चार वर्षांनंतरही चोरटे मोकाटच; पोलिसांच्या तपासाबाबत भक्तांकडून नाराजी

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी चोरी करुन मूर्तींच्या मागे लावलेली सुमारे 40 किलो चांदी लंपास केली होती. 11 डिसेंबरला येथील यात्रा संपल्यानंतर ही चोरी झाली होती. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, तपासासाठी रायगड जिल्हा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तयार करण्यात आले आहे. परंतु, चार वर्षांचा कालावधी उलटूनही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने दत्तभक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील मंदिरांतील दानपेट्या फोडून पैसे, देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यातील काही चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी तालुक्यातील प्रसिद्ध चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरातील चोरीचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी तपास करण्याचे सोडून दिले की काय, अशी भावना दत्तभक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चौल मंदिरातील 40 किलो चांदी चोरीला गेल्याची घटनेला आता चार वर्षे होतील; परंतु, अद्याप तपास लागलेला नाही. यंदा चौल-भोवाळे येथील दत्तयात्रेला गुरुवार, दि. 4 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर दत्त मंदिरातील चोरीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

चार वर्षांनंतरही तपास नाही
चौल-भोवाळे येथील दत्त मंदिरात चार वर्षांपूर्वी चोरी झाली होती. या मंदिरातील तब्बल चाळीस किलो चांदीची प्रभावळ चोरीला गेली होती. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरट्यांचे छायाचित्रण आढळून आले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्यात चार वर्षांमध्ये तीन अधिकारी बदलून आले. परंतु, एकाही अधिकाऱ्याला या चोरीचा तपास करता आला नाही. सध्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत किरवले यांच्याशी संपर्क साधून तपासाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
प्रभावी यंत्रणा राबवा
यावर्षी गुरुवार, दि. 4 डिसेंबरपासून दत्तयात्रेला प्रारंभ होत आहे. दरवर्षी या ठिकाणी पाच दिवसांची यात्रा भरते. जिल्ह्यासह राज्य-परराज्यातील अनेक व्यावसायिक या यात्रेत व्यवसायासाठी येत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. बाहेरुन येणाऱ्या अनोळखी व्यावसायिकांबरोबर सर्वच व्यावसायिकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापासूनच प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी, अशी मागणी दत्तभक्तांकडून होत आहे.
आश्वासन हवेत विरले
मंदिरात चोरी झाली तेव्हा रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे होते. त्यांनी ग्रामस्थांना चोरांचा छडा लावून लवकरच जेरबंद करू, असे ठाम आश्वासन दिले होते. परंतु, चार वर्षांनंतरही चोर पकडले गेलेले नाहीत. एकही धागा हाती लागलेला नाही. तपास आजही तिथेच अडकलेला आहे. तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग उतरला, स्पेशल पथक नेमले गेले, चौकशीचे ढोल बडवले गेले. मात्र, कुठलाही सुगावा नाही.
पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून आंचल दलाल यांनी कारभार हाती घेतल्यापासून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच, कामात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचाही त्यांनी चांगला बंदोबस्त केल्याचे समजते. त्यामुळे आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी आता तरी तपासाची चक्रे गतीने फिरतील, अशी तमाम दत्तभक्तांची आशा आहे.

आतापर्यंत चोर सापडणे गरजेचे होते, अशी माझ्यासह सर्वच दत्तभक्तांची भावना आहे. यामध्ये फक्त बाहेरचेच आहेत की आपल्याकडील कोण आहेत, हे कळायला तर हवेच. नुसता चोरीचा माल मिळणे महत्त्वाचे नाही, तर चोर पकडणे गरजेचे आहे.

– निकेश घरत, दत्तभक्त, चौल-सागमळा

Related

Tags: alibag newschaulchaul newsdatt mandir tempaleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

विमा कंपनी लागली कामाला

Next Post

शिक्षक, शिक्षकेतरांना दिलासा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सोन्याच्या हंड्यांच्या अफवेला पूर्णविराम
रायगड

सोन्याच्या हंड्यांच्या अफवेला पूर्णविराम

February 23, 2026
मिरची गल्लीमध्ये मिरच्यांची रेलचेल
पनवेल

मिरची गल्लीमध्ये मिरच्यांची रेलचेल

February 23, 2026
वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका
sliderhome

वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

February 23, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात

February 23, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

खळबळजनक! रोह्यात दुचाकीस्वाराकडून चाकू हल्ला; तिघेजण जखमी

February 23, 2026
खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी
sliderhome

खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी

February 23, 2026
Next Post
शिक्षक, शिक्षकेतरांना दिलासा

शिक्षक, शिक्षकेतरांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?