| मुंबई | प्रतिनिधी |
लाडकी बहीण योजनेचा फटका आता आनंदाचा शिधा योजनेला बसणार असून, यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही, असे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. सणासुदीच्या काळात राज्यातील गरीबांना केवळ 100 रुपयांमध्ये चार वस्तू या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात.
राज्यातील तिजोरीतील एकदम 45 हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी द्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम इतर योजनांवर थोडा-थोडा होत असल्याचं छगन भुजबळांनी कबूल केलं. आम्ही आता राज्य सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या योजनांच्या निधीबाबत मागे-पुढे होत असलं तरी आम्ही निधी उपलब्ध होईल, तशी योजना चालवत राहू, असंही छगन भुजबळ म्हणाले.





