| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ना.ना. पाटील हायस्कूलच्या 1984-85 सालच्या विद्यार्थ्यांचे तिसरे स्नेहसंमेलन शनिवार, 8 जुलै रोजी मोठ्या उत्साहात हिरकणी व्हीला पोयनाड येथे संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या परिवारातील वर्षभरात कोरोनाच्या कालावधीत देवाज्ञा झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांच्या पाल्यांचा शैक्षिकदृष्ट्या, कला, क्रीडा आदी शेत्रातील प्रावीण्य मिळविलेल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शशिकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगताना संपूर्ण श्रेय पाटील कुटुबिय यांच्या कृपाशीर्वादानेच लाभले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील पाटील यांनी केले, तर आयोजन हिरकणी व्हिलाचे मालक आशा अशोक पाटील यांनी सर्वांच्या चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली होती. या परिवाराला उपस्थित सर्वांच्या वतीने श्रीकृष्णाची मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली. या कार्यक्रमासाठी राजेश बैकर, अजित पाटील, मंगल पाटील, प्रगती शिंगासने, वैशाली म्हात्रे, दशरथ दांडेकरआदींनी परिश्रम घेतले.