। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकरणाने व्यापलेला परिसर आहे. परिसरात विविध राज्यांतील कामगारवर्ग येथे वास्तव्यास आहे. परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढतच असल्याने रसायनी पोलीस ठाण्यातील पोलीस यंत्रणेवर ही अधिक ताण येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर चोख पोलीसी सेवा बजावत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे आणि पोलीस कर्मचारी महत्वाची कामगिरी निभावत आहेत. तसेच, रसायनी पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते. नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा प्रदान करण्याचे काम रसायनी पोलीस ठाणे करत आहे. म्हणूनच रसायनी पोलीस ठाण्याला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीत योग्य कामकाजाबाबत ++ ग्रेडने आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांचे अधिक श्रेय असल्याचे दिसून येते.