सातार्‍याचा तिढा सुटला

शशिकांत शिंदे यांना उमेदवारी

| सातारा | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुका आता अगदीच जवळ आल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातार्‍याच्या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे. महाविकास आघाडीकडून सातार्‍याच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

लढवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मविआचा सातार्‍यातील उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. मध्यंतरी या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही चर्चेत आले होते. मात्र आता सातार्‍याच्या जागेचा सस्पेन्स संपला असून शशिकांत शिंदे हे सातार्‍यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

शरद पवार गटाने बराच काळ सातार्‍यातील उमेदवार जाहीर केलेला नव्हता. श्रीनिवास पाटील यांनी लढण्यास नकार दिल्यानंतर सातार्‍यातील पेच निर्माण झाला होता. सातार्‍यासाठी शरद पवार गटातून तीन उमेदवार इच्छुक होते. मात्र, ही जागा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनीही सातार्‍यातून लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सातार्‍याच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्ता कट झाला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Exit mobile version