अकृषक व अभियांत्रिकी महाविद्यालये आंबेडकर विद्यापीठात समाविष्ट

। पोलादपूर । शैलेश पालकर ।
लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठामध्ये एकीकडे राज्यातील अकृषक विद्यापिठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश करण्याचा खटाटोप राज्यसरकारच्या माध्यमातून सुरू असून दुसरीकडे या विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी वॉक इन इंटरव्हयूचे आयोजन कंत्राटी पध्दतीने येत्या आठवडयात करण्यात येऊन अत्यल्प वेतनामध्ये कर्मचारी 11 महिन्यांसाठी नियुक्त करण्याचे राज्यव्यापी प्रयत्न सुरू झाले आहेत.

बाटूमध्ये राज्यातील 67 अभियांत्रिकी महाविद्यालये वर्ग झाली आहेत. मुंबई विद्यापिठांतर्गत 1, पुणे विद्यापिठांतर्गत 30, नागपूर विद्यापिठांतर्गत 9 आणि औरंगाबाद विभागातील 27 महाविद्यालयांचा समावेश आहे.सोलापूर आणि नागपूर विद्यापिठांमध्ये बाटूचे उपकेंद्र उभारण्याकामी विद्यापिठांची जागा मागण्यात आली आहे. राज्यातील विविध विद्यापिठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती झाली नसताना बाटूच्या उपकेंद्रालाही कर्मचारी पुरवण्याची सूचना राज्यसरकारकडून संबंधित विद्यापिठांना करण्यात आली असून राज्यातील या विद्यापिठांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्काच्या माध्यमातून 60 ते 65 कोटींच्या महसूलापैकी सुमारे 70 टक्के महसूल या धोरणामुळे बाटू कडे वर्ग होणार आहे.

विद्यापिठामध्ये नुकताच 6 जून 2022 पासून अत्यल्प वेतनातील नोकरभरतीसाठी मवॉक इन इंटरव्हयूफचा प्रकार सुरू झाला असून यामध्ये प्राध्यापक वर्गाच्या 30 हजार पगाराच्या 63 जागा, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी व सहायक जनसंपर्क अधिकारी या प्रत्येकी एक जागा, 3 ज्युनियर सिव्हील इंजिनियर, 1 इलेक्ट्रीकल ज्युनियर इंजिनियर, 10सॉफ्टवेअर इंजिनियर, 2 स्पॉट इंस्ट्रक्टर, 3 मेडीकल ऑफिसर, 5 अकाऊंटंट, 5 सिव्हील सुपरवायझर, 1 इलेक्ट्रीकल सुपरवायझर, 1 गार्डन सुपरवायझर, 4 वर्कशॉप इन्स्ट्रक्टर, 8 होस्टेल क्लर्क, 2 नर्स, 32 क्लार्ककम टायपिस्ट डाटा एन्ट्री ऑपरेटर, 11 लॅबरोटरी असिस्टंट, 4 ड्रायव्हर, 4 लायब्ररी असिस्टंट, 3 लायब्ररी ट्रेनी आणि 2 लायब्ररी अटेंडंट अशा एकूण 167 जागांसाठी मवॉक इन इंटरव्हयूफ होणार असल्याचे सोशल मिडीयाद्वारे व्हायरल झालेल्या पीडीएफ फाईलवरील जाहिरातवजा माहितीवरून सर्वाना समजून आले आहे.

Exit mobile version