नेरळ ग्रामपंचायतकडून नालेसफाई कामाला सुरुवात

| नेरळ । वार्ताहर ।
नागरीकरणामुळे शहर म्हणून ओळख निर्माण केलेल्या नेरळ या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचा कारभार देखील मोठा पसरला आहे. नेरळ गावात शहरीकरणामुळे सांडपाणी याने भरून वाहणारी गटारे तसेच नाले यामुळे शहरीकरण झाल्याचा भास होत आहे. मात्र त्या शहरवजा गावातील नाल्यांना झाडाझुडपांनी वेधले आहेत. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असून आता नेरळ गावातील नालेसफाई सुरु करण्यात आली असून केवळ एका नाल्याचे काम सध्या सुरु आहे.
नेरळ या मध्य रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या गावाचे मुंबई चे उपनगर म्हणून विकास होत आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षात मोठ्या प्रमाणांत नेरळ ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरण झालेले दिसून येत आहे.त्यामुळे नागरीकरणाबरोबर अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यातील सांडपाणी व्यवस्थापन हो मोठी समस्या नेरळ सारख्या ग्रामपंचायत असलेल्या गावात नव्याने निर्ममन झाली आहे.त्यातील गावाचा विस्तार मोठा असल्याने येथील गटारे आणि नाले हे झाडाझुडपांनी व्यापले आहेत.बाजारपेठ भागातील गटारे ग्रामपंचायतचे आरोग्य कर्मचारी दररोज स्वच्छ करीत असतात. पावसाळा तोंडावर आला असताना नेरळ ग्रामपंचायत कडून नालेसफाई ला सुरुवात झाली आहे. सध्या नेरळ पोलीस ठाणे च्या बाजूला असलेल्या नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरु असून गावातील सर्व अन्य नाले यांची साफसफाई अद्याप बाकी आहे.

Exit mobile version