| खोपोली | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुरोगामी युवकचे नेते, उपसरपंच भूषण पाटील आणि आरडीसी बँकेचे संचालक प्रविण लाले यांच्या माध्यमातून 20 शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ श्री छत्रपती विद्यालय देवन्हावे येथून करण्यात आला. या कार्यक्रमासाठी केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, शेकाप नेते शांताराम पाटील, खोपोली शहर खजिनदार जयंत पाठक, माजी उपसरपंच संजय कडव, संदेश चौधरी, माजी सरपंच भगवान पाटील, बंटी नलावडे, स्नेहा कडव, ज्ञानेश्वर नलावडे, नरेंद्र चव्हाण, विनोद कडव, प्रफुल्ल बारस्कर, समर कडव, अंकुर भोपतराव, प्रतिक नलावडे, नितेश चौधरी आदि उपस्थित होते.