मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेना-भाजपमधील संघर्ष आता तीव्र होऊ लागला असून,जनआशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे.31 ऑगस्टला त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान,यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली असून,केंद्र सरकार कामाला लागले,जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली.वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू.असे राऊत यानी ट्विटमध्ये नमूद केलेले आहे.