| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मणिपूरमधील हिंसाचारावरुन संसदेत आक्रमक झालेल्या विरोधकांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्याविराोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरु केलेली आहे. तशी नोटीसही लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलेली आहे. संसदेमध्ये अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच मणिपूर घटनेवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना व्यक्त होणारे पंतप्रधान संसदेमध्ये मात्र मणिपूर घटनेवर निवेदन देत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बोलताना विरोधक जाणून बुजून मणिपूरवर संसदेत चर्चा होऊ देत नसल्याचीही टीका केल्याचं पाहायला मिळालं.
अविश्वास ठराव कशासाठी?
दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीएचं संख्याबळ बहुमतापेक्षाही खूप जास्त आहे. त्यामुळे अविश्वास ठराव मांडला तरी त्याचा निकाल हा सरकारच्याच बाजूने लागणार आहे. मात्र, तरीही विरोधकांनी हा ठराव मांडण्याची नोटीस दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अविश्वास ठरावाची नोटीस का दिली? यासंदर्भात विरोधकांकडून माहिती देण्यात आली आहे.