कामोठे परिसरात धूरफवारणी

शेकापच्या मागणीची पालिकेकडून दखल

| पनवेल | वार्ताहर |

डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे शेतकरी कामगार पक्षाने महापालिकेकडे पुढाकार घेत केमिकल आणि धूरफवारणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामोठे 10, 15, 16, 18, 19 या सेक्टरमधील जवळपास 30-35 सोसायट्यांमध्ये केमिकल फवारणी आणि धूरफवारणी करण्यात आली.

कामोठे शहरामध्ये डेंग्यूसारख्या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कामोठेमध्ये एक दुर्दैवी मृत्यूसुद्धा या रोगामुळे झाला आहे. मोठ्या प्रमाणात होत असणारा डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील ज्या सोसायटीमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, त्या सोसायटीमध्ये त्वरित फवारणी करावी, तसेच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच सोसायट्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शेकाप कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, उपाध्यक्ष नितीन पगारे आणि प्रमुख संघटक अल्पेश माने यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत पनवेल महानगर पालिकेद्वारे 10, 15, 16, 18, 19 या सेक्टरमधील जवळपास 30-35 सोसायट्यांमध्ये केमिकल फवारणी आणि धूरफवारणी करण्यात आली.

Exit mobile version