प्रवाशांना सूचना! मुंबईला जाणारा मार्ग बंद

| मुंबई | प्रतिनिधी |

सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून दरड कोसळण्याच्या घटनाही वाढत आहे. रस्त्यावर दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर आडोसी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या तिन्ही लेनवरील वाहतूक ठप्प झाली असून ही वाहतूक पुण्याच्या लेनवरून फिरविण्यास सुरुवात झाली आहे.

ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. आडोशी गावचे हद्दीजवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेन वरती पडला.

सध्या मुंबई लेनवरील वाहतूक थांबली आहे. सदरचा मातीचा लगदा हा आयआरबीचे जेसीपी, डंपरच्या सहाय्याने काढून घेण्याचे काम चालू आहे. साधारणतः 20 ते 25 डंपर डबर रोडमध्ये पडलेला ढिगारा काढत आहेत. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ उपस्थित असून लगदा काढण्याचे काम चालू आहे.

Exit mobile version