कांदळवनांवर आता तिसरी नजर

| पनवेल । वार्ताहर ।

खारघर सेक्टर दहा परिसरातील कांदळवन परिसरात नवी मुंबई कांदळवन संधारण विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे खारघर सेक्टर 10 कोपरा खाडीत अनधिकृत रेती उपसा करणार्‍या रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

खारघर सेक्टर 10 सर्व्हे. नं 80, 81, 82 आणि 83 कोपरा परिसरातील कांदळवन जागेत सिमेंटने भरलेल्या गोण्या आणि डेब्रिजने भरून बांध तयार करण्यात आला आहे. यामुळे पाचशेहून अधिक कांदळवन प्रजाती मृत्यू पावल्याचे प्रकार घडले होते. कांदळवनांची हानी झाल्याने नवी मुंबई कांदळवन संधारण विभागाने पनवेल प्रांत कार्यालयाकडे पत्र पाठवून संबंधित व्यक्तीवर आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावेळी डेब्रिज टाकणार्‍या एका ग्रामस्थावर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे कांदळवनलगत असलेल्या खाडीत मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उपसा केला जात आहे. काही असामाजिक घटकांकडून खाडीतील कांदळवनांवर अतिक्रमण केले जात आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी वनविभागाने कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. खारघरमधील कांदळवन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार असल्यामुळे कोपरा खाडीत बेकायदा रेती उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

खारघर सेक्टर दहा परिसरात काही कांदळवण भाग आहे. सदर भागात लवकरच सिसिटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.

सुधीर मांजरे, वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन संधारण, नवी मुंबई
Exit mobile version