• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आता एसटीची प्रतीक्षा संपणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 3, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आता एसटीची प्रतीक्षा संपणार
0
SHARES
290
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार

| रायगड | प्रतिनिधी |

वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, असे म्हणणाऱ्या प्रवाशांना आता एसटीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रत्येक थांब्यावरील एसटीचा अचूक ठावठिकाणा आपली एसटी ॲपद्वारे कळणार आहे. आपली एसटी या नावाच्या नवीन ॲपचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले असून, या ॲपचा प्रवाशांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेत येत नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होता. परंतु, प्रवाशांचा एसटी महामंडळावर विश्वास असल्याने कितीही वेळ झाला तरीही ते एसटीची वाट पाहतात. प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागू नये साठी एसटी महामंडळाने कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ॲपचे आपली एसटी असे नामकरण केले आहे. या ॲपमुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला.

‌‌‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या साहाय्याने विकसित केलेल्या आपली एसटी ॲपमुळे प्रवासी जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकतील. प्रवासी माहिती केंद्राद्वारे बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार याची अचूक माहितीही मिळेल. त्यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहात थांब्यावर तासंतास थांबण्याची गरज नाही. थेट बस उपलब्धतेनुसार ते थांब्यावर पोहोचू शकतील.

तांत्रिक त्रुटी दूर करणार
एसटी महामंडळातील 12 हजारपेक्षा जास्त बस व राज्यभरातील एक लाखापेक्षा जास्त मार्गाची माहिती ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या ॲपचा लाखो प्रवासी वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनी तांत्रिक त्रुटींबाबत सूचित करावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले.
ॲपमध्ये तिकीट आरक्षण सेवा
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी उपलब्ध करण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधणे शक्य आहे. लवकरच एसटीच्या सध्या असलेल्या तिकीट आरक्षण ॲपमध्येही बसची थेट माहिती समाविष्ट केली जाईल. ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.
ॲपमध्ये अनेक सुविधा
अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा यात उपलब्ध आहेत. प्रवाशांना जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान धावणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती मिळवणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक नमूद करून बसचा थेट मागोवा घेणे आदी सुविधांचा त्यात समावेश आहे. सध्या हे ॲप एमएसआरटीसी कम्यूटर ॲप या नावाने प्ले स्टोअरमधून प्रवाशांना डाऊनलोड करता येईल. लवकरच आपली एसटी हे नाव प्ले स्टोअरमध्ये दिसेल.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

एसटी बस चालकाचा प्रताप

Next Post

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेचे सर्वसाधारण सभा संपन्न

February 23, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर
sliderhome

जिल्हा परिषद कर्मचारी रस्त्यावर

February 23, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
तलावात बुडून बालकाचा मृत्यू
sliderhome

तलावात बुडून बालकाचा मृत्यू

February 23, 2026
पनवेल

विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

February 23, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?