अलिबागमध्ये पौष्टिक तृणधान्य शिबीर

| अलिबाग | प्रतिनिधी |

महा-राकावि सोसायटी, मुंबई व राकावि महामंडळ, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा दवाखाना, अलिबाग येथे मंगळवारी (दि.28) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य शिबीर साजरे करण्यात आले. यानिमित्त तृणधान्याचे फायदे व पौष्टिक आहाराबाबतचे मार्गदर्शन तसेच पदार्थांचे प्रदर्शन FORMee स्टुडिओचे शशिकांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज मोरे यांनी प्रदर्शित केले.

सदरील कार्यक्रम महा-राकावि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक करंजकर, संचालक (प्रशासन) महेश वरुडकर, संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय ढवळे, राज्य आयुष नोडल अधिकारी डॉ. संजय माधवराव मुखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तसेच डॉ. अलका कांबळे, वैद्यकीय प्रशासन अधिकारी, ठाणे व डॉ. प्रफुल्लता शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन शिषलरास लाभले.

या शिबिरास सेवा दवाखाना अलिबाग येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्ष गुजराथी व कर्मचारी वर्ग स्मिता कुंटे, प्रियंका घरत, प्रणिता भोईर, संदीप म्हापणकर, अंकिता झेंडेकर यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबाबत डॉ. स्वामी-वैद्यकीय अधिकारी, डॉ. हेतल-दंतविशेषज्ञ, महेश दायमा-न्यायालय व्यवस्थापक यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Exit mobile version