रक्तक्षय निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पौष्टिक आहार स्पर्धा

अदानी फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

| आगरदांडा | प्रतिनिधी |

सुदृढ महिला आनंदी कुटुंबाचा सर्वांत मोठा आधारस्तंभ असतो. दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींमुळे किंवा धावपळीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. कुटुंबियांच्या सुखाची जबाबदारी सर्वस्वी घरच्या लक्ष्मीची असते. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे व त्यांना आरोग्यविषयक पौष्टिक पदार्थ खाण्याचे माहीत पडावे यासाठी अदानी फाऊंडेशनकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता.

कार्यक्रमाला प्रामुख्याने आगरदंडा ग्रामपंचायत सरपंच ॠषाली डोंगरीकर, आगरदंडा जि.प. शाळा मुख्याध्यापक अलका शिंदे, अदानी फाऊंडेशन वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे तसेच महिला वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अवधूत पाटील यांनी महिलांना हिमोग्लोबीन वाढ होण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाण्याचे महत्त्व पटवून दिले. किशोरावस्था हा मुलींच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. अलका शिंदे यांनी अदानी फाऊंडेशन अंतर्गत ग्रामीण भागातील विकासासाठी राबविण्यात येणार या उपक्रमांची प्रशंसा केली.

जयश्री काळे यांनी महिला आणि किशोयवीन मुलींना उद्देशून आणलेल्या विविध पौष्टिक आहारची प्रशंसा केली. या पौष्टिक आहार स्पर्धेमध्ये महिलांनी चढाओढीने भाग घेतला. प्रथम क्रमांक रिमा राजेश डोंगरीकर व उज्वला भाटकर, द्वितीय अर्पिता चिंधरकर, दीपा प्रविण खोत, तृतीय क्रमांक रूपाली चिंधरकर आणि वैष्णवी विलास चिंधरकर यांनी पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकास उपस्थित मान्यवरांकडून बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखी प्राजक्ता आडूळकर यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version