। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी प्राथमिक शाळा वेश्वी येथे ङ्गराष्ट्रीय पोषण आहार महिनाफ अंतर्गत विदयार्थ्यासाठी पौष्टीक अन्नपदार्थ स्पर्धा तसेच माता-पालकांसाठी आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवुन मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी आयुर्वेदाचार्य तसेच आहार तज्ञ डॉ. निती आंबेतकर व त्यांच्या सहकारी मीरा ठाकुर तसेच माता पालक,सर्व विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जीवनात पौष्टीक, पुरक आणि संतुलित आहार भूमिका बजावतो याचे महत्व पटवून देताना आहार तज्ञ डॉ. निती आंबेतकर यांनी विदयार्थ्याशी तसेच माता-पालकांशी थेट संवाद साधत खुप छान मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिना वाटवे यांनी केले.
( छायाचित्र – अमोल नाईक )