जिल्ह्यातील नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 14 ऑगस्ट रोजी जिल्हाभरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात येणार आहे. यावेळी वृक्ष लागवड करण्यासोबत विद्यार्थी व नागरिकांना पर्यावरण संवर्धन शपथ दिली जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा भाग म्हणून 14 ऑगस्ट रोजी जिल्हाभरात वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी बांबू तसेच विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट सहभागी होणार आहेत. त्यांना पर्यावरण संवर्धन शपथ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version