पेण नगरपालिकेत प्लास्टिक बंदीची शपथ

| पेण | प्रतिनिधी |

वसुंधरा आठवडा साजरा करताना निसर्गाच्या पंचमहाभूतांच्या घटकांचे सवंर्धन करण्याच्या दृष्टीने नगरपरिषद मार्फत (दि.26) रोजी माझी वसुंधरा शपथ नगरपालिकेच्या सभागृहात आरोग्य विभागाच्या प्रमुख अंकिता इसाळ यांनी दिली. सर्वांनी ही शपथ घेऊन भविष्यात त्याचे पालन करण्याचे निश्‍चित केले. तसेच माझं पेण सुंदर पेण करण्यासाठी प्लॅस्टिक बंदी करण्याच्या दृष्टीने पुढे पाउले उचलण्याचे ठरले आहे. त्याचाच भाग म्हणून प्लास्टीक पिशवी वापर बंदीच्या अनुषंगाने नगरपरिषद कार्यालयात बचत गटामार्फत कापडी पिशवीचा स्टॉल उभारण्यात आला असून कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कापडी पिशवी खरेदी केल्या. मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी स्टॉलचे उद्घाटन केले असून सर्व नागरिकांनी कापडी पिशवी वापर करण्याचे आवाहन केले आहे. सदर कार्यक्रमास मुख्याधिकारी जीवन पाटील माजी नगरसेवक संतोष पाटील, राजाराम नरूटे, शिवाजी चव्हाण, अंकिता इसाळ, रेश्मा करबेले, सुहास कांबळे, आबासाहेब मनाळ, प्रशांत ढवळे, रमेश देशमुख, भरत निंबरे, उमंग कदम, शेखर अभंग, विनायक बनसोडे तसेच इतर कर्मचारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते.

Exit mobile version