ओबीसी आरक्षणाची सूत्रे भुजबळांच्या हाती

मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांनी आगामी निवडणुकांसाठी आढावा घेतल्याचं कळतंय. तर मंत्र्यांच्या कामाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी बाळासाहेब पाटील, जयंत पाटील, नरहरी झिरवळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, संजय बनसोड, राजेंद्र शिंगणे पोहचले. यासोबतच छगन भुजबळ आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक देखील उपस्थित होते..

आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, ही राष्ट्रवादीने भूमिका घेतली आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, अशी भूमिका मांडण्यात आली. यासाठी कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

Exit mobile version