ओबीसी आरक्षणः राष्ट्रवादीतर्फे स्वागत

। खोपोली । प्रतिनिधी |
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्थार्पित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयायाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश असल्याचे सांगत खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी मोहन औसरमल, मनेश यादव, अतुल पाटील, सुवर्णा मोरे, मंगेश दळवी, तुकाराम साबळे, रमेश जाधव, किशोर पाटील, सचिन मसुरक, दर्शन आहिर, जयेंद्र शेंडे, विशाल गायकवाड, महिला सचिव जयश्री डोंगरे, वैशाली भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय झाला होता. याबाबत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी नेते छगन भुजवळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. बांठिया आयोगाने ओबीसी आरक्षण देण्यात मोठी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले असून ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीमुळेच मिळाले असल्याची प्रतिक्रिया मोहन औसरमल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Exit mobile version