अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लिल चाळे; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।
खारघरमधील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोंड रुमालाने बांधून तिच्यासोबत अश्‍लिल चाळे करणार्‍या एका 50 वर्षीय आरोपीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर सेक्टर 10 मधील पाण्याच्या टाकीजवळील झोपडपट्टीत राहणारी 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी हि घरी एकटी असताना त्यांच्या बाजूला राहणारा 50 वर्षीय आरोपी नूर अनारुल हुसेन याने तिच्या घरात येऊन तिच्या तोंडाला दाबून जबरदस्तीने उचलून स्वतःच्या घरी नेले. तसेच तिच्या तोंडाला रुमालाने बांधून आरोपीने तिचा शारिरिक छळ केला.

याबाबत त्या चिमुकलीने सर्व प्रकार घरातील कुटूंबियांना सांगितला. त्यामुळे तिच्या पालकांनी याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

Exit mobile version