बीड | वार्ताहर |
एसबीआय हैद्राबाद,महाराष्ट्र बँकेत शेतकर्यांची पीक कजार्र्साठी अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.ती तातडीने थांबवून शेतकर्यांना पीक कर्ज दिले जावे,अशी मागणी शेकापतर्फे करण्यात आली आहे.
केज येथील स्टेट बँक हैद्राबाद, एसबीआय महाराष्ट्र बँक या तिन्ही बँकेच्या संदर्भात शेतकरी आमच्याकडे तक्रारी करत आहेत या बँकेमध्ये शेतकर्यांची पीक कर्जासाठी अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत, असे शेकाप नेते मोहन गुंड यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणले आहे.
केज शहरातील बँकेत दरवाजे लावून घेतले जातात आणि आत मध्ये बँकेचा दैनंदिन कारभार चालू असतो.अशावेळी जुने कर्जप्रकरणे नवीन करणे, कर्जमाफी पीककर्जासाठी लागणारे कागद कोणती,याबाबत कोणा सोबत चर्चा करायची असा प्रश्न शेतकर्यांना पडतो. याबाबत कोणीही कर्मचारी शेतकर्यांची संवाद साधत नाहीत शेतकरी रोज चकरा मारून त्रासले असल्याचे गुंड यांनी म्हटले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी केज तालुक्यातील सर्व बँक अधिकार्यांची कर्ज वाटपा संदर्भात तात्काळ बैठक घ्यावी. संबंधित बैठकीत शेतकरी प्रतिनिधी शेतकरी आणि बँक अधिकारी असावेत, वरील तिन्ही बँकेच्या अधिकार्यांना तात्काळ आपण समज द्यावी, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने बँकेलाच कुलूप ठोकण्यात येऊन कामकाज बंद करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मोहन गुंड यांनी निवेदनात दिला आहे यावेळी अॅड निखील बचुटे, अमीर इनामदार, मोईन पठाण आदी उपस्थित होते.दरम्यान शेतकर्यांच्या पीक कर्जा संदर्भात अडचणी असतील त्यांनी शेतकरी कामगार पक्ष कार्यालय मेन रोड किंवा 9423979492 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहनही गुंड यानी केले आहे.