ऑक्टोबर हिटचा तडाखा! रायगडसह कोकणातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट

तापमानात वाढ होण्याचा अंदाज

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातून परतीच्या पावसाने उघडीप घेतल्यानंतर उष्णतेत वाढ झाली आहे. मुंबईसह कोकणातील रायगड, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत काही भागांतील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. राज्यातील काही ठिकाणी कमाल तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात; मात्र राज्यभर जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version