ओडिशाचे हॉकीपटू बनले करोडपती

मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी 2.50 कोटींचे बक्षीस
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. सात पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंनी हॉकीमध्येही कांस्यपदक मिळवलं. भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्यपदकावर नाव कोरलं. तब्बल 41 वर्षांनंतर मिळवलेल्या हॉकीतील पदकामुळे खेळाडूंवर देशभरातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव होत होता. हा वर्षाव अजूनही थांबला नसून, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या राज्यातील ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघात असणार्‍या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस दिले.

भारतीय पुरुष संघातील सदस्य बीरेंद्र लाकड़ा आणि अमित रोहिदास यांना प्रत्येकी 2.50 कोटी, तर महिला संघातील दीप ग्रेस एक्का आणि नमिता टोप्पो यांना प्रत्येकी 50 लाख रुपये देत त्यांचा सन्मान केला. पटनायक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये हा सन्मान समारोह ठेवला होता. यावेळी त्यांनी लाकड़ा आणि रोहिदास यांना राज्य पोलीस विभागात पोलीस उपाधीक्षक हे पददेखील बहाल केलं.

Exit mobile version