| पनवेल | वार्ताहर |
पावसाळ्यात शहरातील नाले तुंबू नये, यासाठी पालिकेकडून नालेसफाई केली जात आहे. मात्र, पालिकेच्या ठेकेदारांकडून गटारातून बाहेर काढलेली माती तशीच पदपथांवर ठेवण्यात आली असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तळोजा वसाहत सिडकोकडे असताना सेक्टरनिहाय ठेकेदारांची नेमणूक करून नाले, गटारे साफसफाईची कामे दिली जात होती.
अशातच आता सिडको वसाहत पनवेल पालिकेकडे हस्तांतर झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची कामे योग्य प्रकारे होतील, अशी अपेक्षा रहिवाशांना होती. मात्र, परिस्थिती अजूनही तशीच असल्याचा अनुभव तळोजावासीयांना येत आहे. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतरही तळोजा फेज एक वसाहतीत गटारांची साफसफाई केली जात असून काढलेली माती, कचरा पदपथांवरच ठेवला असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता
पावसाळी कामासाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदाराच्या चढाओढीमुळे काम मिळावे, म्हणून कमी दरात निविदा भरली जात असे. त्यामुळे अनेकदा नाले, गटारांची साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास येत होते. आता तळोजा वसाहत पालिकेकडे हस्तांतरित झाली असून ज्या प्रभागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे.







