वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकावर गुन्हा

माणगाव | वार्ताहर |
माणगाव-पुणे रस्त्यावर ट्रेलर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 16 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पॉस्को कंपनी ईस्ट गेट समोर घडला.

याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अमित भिसे (26) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्ह्यातील आरोपी अशोक भकेलू राम बिन (34) रा. नावडागाव, कळंबोली, ता. पनवेल याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर क्र.एम.एच 46 बी बी 5229 पुणे-माणगाव रस्त्यावर लोकांच्या जीवितास धोका होईल अशा स्थितीत उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. या गुन्ह्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. वडते हे करीत आहेत.

Exit mobile version