| पनवेल | वार्ताहर |
तळोजा परिसरात राहणारी मुलगी सोशल मीडियावर रील बनविण्याचे काम करते. तिला एका मुलाकडून सोशल मीडियावर मेसेज करून मॉर्फ केलेले फोटो पाठवले जात होते. तसेच, हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषणासाठी ब्लॅकमेल केले जात होते. तिचे मॉर्फ केलेले फोटो तिलाच पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. ते टाळण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली जात होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







