अपसंपदा बाळगणाऱ्या मीनल दळवींवर गुन्हा

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्यावर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीनल दळवी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार 12 नोव्हेंबर 2022 रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.

मीनल दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या सेवा कालावधी व परीक्षण कालावधीदरम्यान भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची एकूण दोन कोटी 62 लाख चार हजार 595 रुपयांची अपसंपदा जमा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे पती कृष्णा दळवी यांनी परीक्षण कालावधीमध्ये दोन कोटी 22 लाख 94 हजार 138 रुपयांची अपसंपदा जमा केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाल्याने त्यांच्याविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version