| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील भडवळ गावातील तरुणाने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून धर्माबद्दल अपशब्द वापरले होते. त्याबद्दल ममदापुर गावातील तरुणाने नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्या तक्रारीवरून या गुन्ह्यातील आरोपी तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
तरुणाने आपल्या इंस्टग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आक्षेपार्ह आणि बदनामी करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर ममदापूर येथील सायबर कॅफे चालविणाऱ्या तरुणाने पाहिले. त्या तरुणाने आठ ऑगस्ट रोजी नेरळ पोलीस ठाणे येथे जावून आक्षेपार्ह पोस्टबद्दल तक्रार दिली. त्या तक्रारीची खातरजमा नेरळ पोलीस यांनी केली आणि त्यांनतर नेरळ पोलिसांनी भडवळ गावातील तरुणावर भावना दुखावल्या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याबाबत संबंधितांची चौकशी पोलीस उप अधीक्षक विजय लगारे,पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी केली. पोलीस उप निरीक्षक मंडलिक अधिक तपास करीत असून पोलिसांनी धर्माबाबत अपशब्द लिहिणाऱ्या त्या तरुणाला अटक केली आहे. सदर तरुणाला कर्जत येथील न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.