काँग्रेस अध्यक्षपदासाठी रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बजावला मुंबई प्रदेश कार्यालयात मतदानाचा हक्क

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. यासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत होत आहे. काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यात नीलम मुश्ताक अंतुले, डॉ. मोईज अब्दुल अजीज शेख, परशुराम म्हात्रे, श्रद्धा ठाकूर, समीर सकपाळ, इस्माईल घोले, श्रीनिवास बेंडखेले, हनुमंत जगताप, हेमंत मुजुमदार, महेंद्र घरत, विनायक देशमुख, स्नेहल जगताप, मुकेश सुर्वे, डॉ. मनीष पाटील, इस्माईल मुलाणी, श्रीरंग बर्गे यांनी मतदान केले. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली जात आहे. नऊ हजारांपेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस समित्यांचे प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीद्वारे पक्षाध्यक्षाची निवड करणार आहेत. मतदानानंतर सीलबंद मतपेट्या मंगळवारी (दि.18) दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातील. बुधवारी (दि.19) मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिकांची घोळ घातली जाणार आहे. 50 टक्क्यांहून अधिक मते मिळविणार्‍या उमेदवाराची काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली जाईल.

Exit mobile version