। बीड । प्रतिनिधी ।
पोलिस अधिकाऱ्याने बंदूकीचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करुन नग्न फोटो व व्हिडीओ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. रविंद्र लिंबाजी शिंदे असे अत्याचार करणाऱ्या संशयित पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.याबाबत ३९ वर्षीय पिडीतेने शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिडीता व संशयित रवींद्र शिंदे यांची घरे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती. रवींद्र शिंदे यांची पोलिस खात्यात पोलिस उपरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर ते जिल्ह्याबाहेर गेले. परंतु, पिडीतेशी त्याने कायम संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला २०१३ मध्ये रात्रीच्या वेळी बळजबरीने घरात घुसून अधिकाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला आणि पिडीतेचे नग्न व्हिडीओ आणि फोटो काढल्याचे पीडीतेने म्हटले आहे. याविषयी कोणाला सांगीतले तर तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली. वारंवार अत्याचार केल्यानंतर पिडीता गर्भवती राहीली. त्याने बळजबरीने गर्भपात करायला लावला. एक जुन रोजी पुन्हा तो पिडीतेच्या घरात शिरला आणि बळबजरी केली. तर,एक जुलै रोजी तुला व तुझ्या कुटूंबाला जिवे मारुन टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे पिडीतेने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी रवींद्र लिंबाजी शिंदे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






