| अलिबाग | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जंगलामध्ये मानवी कवटी सापडली आहे. मानवी जातीची कवटी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील फलाणी गावाच्या जंगलात एक मानवी कवटी शुक्रवारी(दि.27) दुपारी सापडली आहे. या घटनेची माहिती गोरेगाव पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कवटी ताब्यात घेण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याचा तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान, यापुर्वी याच ठिकाणाहून एक व्यक्ती हरविल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना प्राप्त झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.






