अरे बापरे,भारतीय क्रिकेटपटू इतके गरीब

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तानच्या काही सर्वोच्च क्रिकेटपटूंची पगारवाढ केली आहे. ही पगारवाढ तब्बल 4 पटीनं करण्यात आली आहे. पीसीबीनं केलेली ही पगारवाढ ऐतिहासिक ठरली आहे.ती पगारवाढ पाहून भारतीय संघातील गरिबी समोर आली आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार पीसीबीचा वार्षिक करार हा जूनमध्ये संपला आहे. नव्या वर्षाचा करार करताना पीसीबीने आपल्या अ श्रेणीतील खेळाडूंना मिळणाऱ्या रक्कमेत मोठी वाढ केली आहे. पाकिस्तानच्या अ श्रेणीत तीन खेळाडूंची नावे आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी यांचा या अ श्रेणीत समावेश आहे. या खेळाडूंना प्रत्येक महिन्याला जवळपास 15900 डॉलर्स म्हणजे 13 लाख रूपये देण्यात येणार आहेत. (याचा अर्थ या सर्व अ श्रेणीतील खेळाडूंना आता वर्षाला 1.5 कोटी रूपये मिळतील. यापूर्वी या सर्व खेळाडूंना प्रत्येक महिन्याला 4700 डॉलर्स म्हणजे वर्षाला 46 लाख रूपये मिळत होते.

भारतात नगण्य वाढ
भारतीय संघातील 4 खेळाडू हे सर्वोच्च अ प्लस श्रेणीत आहेत. या ग्रेडमध्ये जे क्रिकेटपटू हे तीनही फॉरमॅटमध्ये खेळत असतात त्यांचा समावेश असतो. सध्याच्या करारानुसार अ प्लस श्रेणीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूला बीसीसीआय वर्षाला 7 कोटी रूपये देते. पाकिस्तानचे खेळाडू लखपती पासून करोडपती झाले आहेत. मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलने ते खूप मागे आहेत. इंग्लंडचे खेळाडू हे पगाराच्या बाबतीत भारतीय खेळाडूंच्याही पुढे आहेत. त्यांच्या टॉप ग्रेडच्या खेळाडूंना वर्षाला जवळपास 10 कोटी रूपये मिळतात.

Exit mobile version