उरणच्या जे एन पी टी बंदर परिसरातील गणेशबेन्जो प्लास्ट प्रकल्पातून ऑईल गळती !!

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुक्याचे सुस्तावलेल्या महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !!  

जेएनपीटी | वार्ताहर |

उरणच्या जेएनपीटी बंदराच्या परिसरातील गणेश बेन्जोप्लास्ट प्रकल्पामधून सांडलेले ऑईल थेट त्या प्रकल्पाला लागून असलेल्या नाल्यांमध्ये वाहून आल्याची सनसनाटी  आली आहे. गटारात आलेले हे पिवळसर ऑईल कर्मचाऱयांच्या माध्यमातून ड्रममध्ये भरण्यात आले असले तरीही पावसाच्या पाण्यातून गटारामामार्फत ते समुद्रात वाहून गेले असल्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे समुद्रातील मासळी देखील प्रदूषित होण्याचा धोका बळावला आहे . विशेष म्हणजे यापूर्वीही २०१६ मध्ये याच प्रकल्पात गळती होऊन आग लागण्याचा प्रकार घडल्याची माहिती काही कामगारांकडून मिळाली आहे . कंपनीचे पब्लिक रिलेशन ऑफिसर श्री. जगदीश यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता कंपनीत टाक्या धुतल्याने ऑईल गटारात सांडले होते मात्र ते आम्ही कामगारांच्या साहाय्याने ड्रम्समध्ये गोळा करून काढून टाकले असल्याचा दावा केला आहे मात्र स्थानिकांच्या म्हणण्या नुसार रात्रभर असे ऑईल थेट समुद्रात सोडले गेल्याची शक्यता आहे . या सर्व प्रकाराबाबत उरण तालुक्याचे प्रशासन मात्र कमालीचे सुस्त असल्याची बाबा समोर आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मात्र याबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे याबाबत येत्या दोन दिवसात तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे 

जेएनपीटी बंदराच्या निमित्ताने उरण तालुक्यात वसविण्यात आलेली गोदामे आणि विविध टॅंक फार्म उरणकरांसाठी अगदी कधीही काळ ठरू शकण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत . येथिल अनेक गोदामामध्ये यापूर्वीच्या काळात आगी लागल्याच्या , हजरडस्ट सारख्या विषारी वायूच्या गळतीची प्रकरणें यापूर्वी घडलेली आहेत . काही गोदामामध्ये लागलेल्या आगीत तर काही कर्मचाऱयांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत . अनेक गोदामांतून सोडल्या गेलेल्या केमिकलचा पाण्यातील संपर्कामुळे परिसरातील खाजणी मासळी मृत झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तर जे एन पी टी बंदर परिसरातील समुद्र किनारी मृत माशांचा खच पडल्याची घटना देखील घडली होती मात्र त्याणानंतरही कोणत्याही प्रकल्पा विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली नव्हती . या सर्व पाश्र्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जे एन पी टी बंदराच्या जागेवर भाडेतत्वावर असलेल्या गणेश बेन्जोप्लास्ट प्रकल्पाच्या बाजूला लागून असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात ऑईल बाहेर आल्याची बाब समोर आली होती . याबाबत जसखार व सोनारी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला याबाबत जाब विचारला होता. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भागात यांनी ही घटनास्थळी भेट देऊन थेट नाल्यात सोडल्या जाणाऱ्या या प्रकाराबद्दल एक व्हिडिओ जारी करीत प्रदूषण नियंत्रण मंडळ कसे या ठिकाणी डोळेझाक करीत आहेत याबद्दल जागृती केली होती. आणि या प्रकरणी आपण कारवाई करावी याबाबात हे प्रकरण लावून धरणार असल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑईल गटारात आले होते की सुमारे पाच ते सहा ड्रम भारून हे गटारातील ऑइल बाहेर काढण्यात आल्याची घटना घडली आहे . या गटाराच्या आजूबाजूला कॅन्टीन , टपऱ्या आदी आहेत त्यातून जर या सांडलेल्या ऑईलला आग लागली असती तर मात्र उरणाचा भोपाळ व्हायला वेळ लागला नसता ! प्रशासनाकडून सातत्याने अशा प्रकल्पांमध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी दाबल्या जात असल्याने एखादा मोठा अपघात घडून उरणाचा भोपाळ झाल्यावरच उरण तालुक्याचे प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ ताळ्यावर येणार का असा सवाल सामान्य उरणकरांकडून विचारला जात आहे! 

Exit mobile version