ओएलएक्स 50 हजाराचा गंडा

। जेएनपीटी । वार्ताहर ।
ओएलएक्सवर ऑनलाईन गाडी खरेदी करणे उरणच्या एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले असून त्याला 50 हजार रूपयाचा गंडा घातला आहे. सादाब नुर सोंडे रा. उरण असे या इसमाचे नाव आहे. या इसमाला कार खरेदी करायची असल्याने त्याने ओएलएक्स या ऑनलाईन वाहन खरेदीच्या अ‍ॅपवर जाऊन कार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने टोयोटो फॉर्चूनर ही गाडी निवडली.

गाडी खरेदी व्यवहार करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याने त्या अनोळखी व्यक्तीशी चर्चा करून गाडीची किंमत 19 लाख अशी ठरविण्यात आली. त्यासाठी त्यांना गणेश भोसले नामक व्यक्तीच्या खात्यात 50 हजार रूपये अ‍ॅडव्हान्स म्हणून भरले आणि दोन दिवसानंतर व्यवहार पुर्ण करणार असल्याचे सांगितले. मात्र दोन दिवसांनी त्या इसमाने पुन्हा सोंडे यांच्याकडे 30 हजार रूपयांची मागणी केली.

त्यावेळेला सोंडे यांना या व्यवहाराबद्दल संशय आला आणि त्यांनी त्या इसमाने दिलेल्या पुणे येथील पत्त्यावर जावून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती व्यक्ती येथे राहत नसल्याचे समजले. त्यामुळे सोंडे यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी याबाबत उरण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उरण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version