हॉकीत ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपेल!

हॉकीपटू धनराज पिल्ले यांना खात्री
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तंदुरुस्त भारतीय हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करेल, असा विश्‍वास आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील पदकाचा दुष्काळ नक्कीच संपेल, असा विश्‍वास भारताचे महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी व्यक्त केला.

पिल्ले यांनी 1992 ते 2004 या कालावधीत सलग चार वेळा ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. ते म्हणाले की, ङ्गङ्घमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची तंदुरुस्ती हीच खूप मोठी ताकद असणार आहे. भारतीय संघ यावेळी नक्कीच चांगली कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. गेल्या पाच वर्षांपासून भारतीय हॉकी संघाची कामगिरी चांगली होत आहे. चॅम्पियन्स करंडक (2016, 2018) तसेच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स (2015 आणि 2017) या स्पर्धामध्ये भारताने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.फफ

भारतीय संघाला प्रत्यक्षपणे शुभेच्छा देता न आल्याने धनराज यांनी मनप्रीत आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांना पत्र लिहून दोन्ही संघांना टोक्योमधील दमदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ङ्गङ्घकरोनाच्या नियमांमुळे मला प्रत्यक्षपणे खेळाडूंची भेट घेता आली नाही. त्यामुळे पत्राद्वारे मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडाग्राममध्ये वास्तव्य करताना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे. प्रत्येक वेळी चांगला संघ मिळूनही भारताला पदकापर्यंत झेप घेता आली नाही. यंदा मात्र त्याच चूका भारतीय संघाने करू नये. अंतिम फेरीपर्यंतचा विचार न करता एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करावे, सेही पिल्ले यांनी सांगितले.

Exit mobile version