जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओम शिंदेला सुवर्णपदक

। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा तायकांदो स्पोर्ट्स असो. आयोजित सब ज्युनियर कॅडेट गटातील फाईट व पुमसे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. कॅडेट गटात 80 किलो वजनी गटातील फाईटमध्ये ओम सुनील शिंदे याने सुवर्णपदक तर पुमसे प्रकारात रौप्य पदक पटकावले. त्याच्या या यशामुळे त्याची राज्यस्तरीय चॅम्पियनशीपसाठी रत्नागिरी जिल्ह्याकडून निवड झाली आहे. ओम शिंदे याने यापूर्वी खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो फाईट स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले होते. त्याला क्रीडा शिक्षक मास्टर सुनील शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, प्रा.एस.एस. अली, व्ही.एच.आय.तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version