महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही

मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या कोरोना विषाणूचा समूह संसर्ग अजून तरी झालेला नसल्याचे उघड झाले आहे. जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील करोना बाधितांचे घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. आता त्याचा अहवाल समोर आला आहे.
जिनोमिक सिक्वेंसिंगच्या अहवालात म्हटले आहे की, राज्यात अजून तरी ओमिक्रॉनचा समूह संसर्ग झालेला नाही. आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणावरून राज्यात डेल्टाचाच समूह संसर्ग असल्याचे पुढे आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजकडे देण्यात राज्य समन्वयाची जबाबदारी आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वयोगटातील कोरोनाबाधितांच्या घेतलेले नमुने दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यातूनच ही माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक अँण्ड इंटीग्रेटीव्ह बायोलॉजी या संस्थेसोबत जीनोम सिक्वेंसिगंच्या अहवाल देण्याबाबत करार केला आहे. आता या इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालात राज्यात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version