#skprojgarmelava! संधी दिलीत, सोनं करुन दाखवू

तरुणांचे चित्रलेखा पाटील यांना आश्‍वासन; मुरुडच्या युवापिढीला रोजगार मेळाव्यात थेट नियुक्तीपत्रे
। मुरुड । राजीव नेवासेकर ।
अलिबागमध्ये घेतलेल्या पहिल्याच रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद लाभल्याने उत्साह दुणावलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्यातर्फे महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यावतीने मंगळवारी (11) मुरुडच्या युवक,युवतींसाठी दुसरा रोजगार मेळावा घेण्यात आला.त्या मेळाव्यासही मुरुड शहर आणि तालुक्यातील हजारो युवक,युवतींनी सहभाग नोंदविला.या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने आम्हाला नोकरीची संधी मिळाली आहे, त्या संधीचे सोनं करुन दाखवू, असा आशावादही पहिल्याच मुलाखतीत नियुक्तीपत्रे मिळालेल्या युवक,युवतींनी व्यक्त केला.

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वप्रथमच भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता.यामध्ये विविध प्रकारच्या 50 कंपन्यांतून तालुक्यातील युवक युवतींना रोजगार मेळाव्यात थेट नियुक्ती पत्र मिळाल्याने घेतलेल्या शिक्षणाचे सार्थक झाल्याचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसून आले.तसेच हा मेळावा मुरुडमध्ये आयोजित केल्याबद्दल सहभागी युवक,युवतींसह त्यांच्या पालकांनी शेतकरी कामगार पक्ष आणि महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांचे मनोमन आभार व्यक्त केले.

मेळाव्याचे उत्तम नियोजन
मंगळवारी सकाळी 10 वा. पासून तालुक्यातील युवक-युवतींनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात गर्दी होती. मेळाव्यात सहभागी होणार्‍या प्रत्येकाची नोंदणीसाठी व्यवस्था केली होती. नोंदणी झाल्यावर शिक्षणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीतील स्टॉलमध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता केली जात होती. मुलाखती झाल्यावर नोकरीची हमी नियुक्ती पत्र मिळाल्यावर प्रत्येकाच्या चेह-यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता. शिक्षण पूर्ण होऊन तीन तीन वर्षे होऊनही नोकरी मिळत नसल्याने हताश, निराश झालेल्या युवक-युवतींना मुरुडमध्ये सर्वप्रथम भरविण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यात थेट नियुक्ती पत्र मिळाल्याने आगळेवेगळे समाधान ओसंडून पहावयास मिळाले.

शिक्षण पूर्ण होऊन नोकरीच्या शोधात फिरावे लागत होते. रोजगार मेळाव्यातून रोजगाराचे दालन खुले झाले अन् थेट नियुक्ती पत्र मिळाल्याने खूप खूप आनंद झाला. मी आभारी आहे.

गणेश भोय, कोर्लई-मुरुड-जंजिरा.

मुरुडमध्ये चित्रलेखा पाटील यांनी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून युवकांना चांगली संधी उपलब्ध करून दिली. मुंबई, पुणे अन्य ठिकाणी न जाता पहिल्याच मुलाखतीत थेट नियुक्ती पत्र मिळाल्याने आनंद व समाधान मिळाले. आयोजकांचे आभार!

-सरोज प्रभाकर धार्वे, सर्वे

मुरुडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. मला स्टॉफ ब्लूम ग्लोबल सर्व्हिस कंपनी मध्ये रोजगार मिळाल्याबद्दल आनंद झाला. आयोजकांचे मनापासून आभार!

-हसन अनिस मुकादम, शिघ्रे

मी बारावी कॉमर्स असून तीन वर्षांपासून जॉबसाठी प्रयत्न करत होते. चित्रलेखा पाटील यांनी मुरुड मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून आम्हाला रोजगार मिळवून दिला. याचा मनोमन आनंद झाला. चित्रलेखाताई पाटील यांचे मनापासून आभार!

निकिता नरेश हिरवे, पारगाण- शिघ्रे

मी दहावी पास आयटीआय मरीन फिटरचा कोर्स करून दोन वर्षे झाली. नोकरीच्या शोधात होतो.शेकापने मुरुडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे खूप आनंद झाला. आयोजकांचे मनापासून आभार!

– साहिल चंद्रकांत कमाने, मजगाव, मुरुड-जंजिरा.

चित्रलेखाताई पाटील यांनी मुरुडमध्ये सर्वप्रथम भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून तालुक्यातील युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. मला थेट नियुक्ती पत्र मिळून रोजगार मिळाल्याबद्दल आनंद झाला. आयोजकांचे खूप खूप आभार!

शेतकरी कामगार पक्ष आणि – सुजल धर्मराज बाजी, मजगाव, मुरुड-जंजिरा.

Exit mobile version