| अलिबाग | प्रतिनिधी |
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्यावतीने एड्स जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये शहरातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये पीएनपी अध्यापक महाविद्यालयाच्यावतीने पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्यातून एड्सविषयक जनजागृती करण्याचा प्रयत्न बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थ्यांनी केला. पथनाट्यास विद्यार्थी व प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे व इतर सहकारी उपस्थित होते.