जनमानसात शंकाकुशंकांना जोर
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून बांधकाम विभागाद्वारे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या नेरळ पंचायत परिसरातील रस्त्याबाबत जनमानसात शंकाकुशंकांना जोर चढला आहे. कारण रस्ता एकीकडे तर त्याची माहितीदर्शक पाटी भलतीकडे असा अजब प्रकार पाहायला मिळत आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नागरी सुविधा विकास मधून तयार केलेल्या रस्त्याचे मंजूर काम वेगळ्या ठिकाणी, प्रत्यक्ष काम वेगळ्या ठिकाणी आणि रस्त्याच्या कामाची पाटी वेगळ्या ठिकाणी हे काय गौडबंगाल आहे?अशी चर्चा रंगली असून, याबाबत कर्जत पंचायत समितीचे शाखा अभियंता कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत.
कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्य सुजाता मनवे यांनी नेरळ ग्रामपंचायत मधील टेपआळी भागात पंचायत समितीच्या सन 2021-22 या सेस फंडातील 15 वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम केले आहे.शासनाच्या नागरी सुविधा विकास मधून तब्बल 15 लाख रुपये खर्चून रस्त्याला पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम मंजूर आहे.नेरळ ग्रामपंचायत मधील टेपआळी भागातील रस्त्याचे काम शासनाने मंजूर केले होते.
15 लाख रुपये खर्चाचे असलेले हे काम करताना संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे अंदाजपत्रक ज्या ठिकाणी रस्ता करायचा होता,तेथे न करता अन्य ठिकाणी रस्त्याचे काम केले आहे असा स्थानिकांचा आरोप आहे.तर कामाची पाटी वेगळ्या ठिकाणी हे काय गौडबंगाल आहे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु मुख्य रस्ता सोडून त्यांनी प्रत्यक्षदर्शी गल्लीतील खराब झालेल्या पायवाटा ह्या पेव्हरब्लॉकचा वापर करून रस्ता सुस्थितीत करून परंतु हे काम पूर्ण झाले आहे.
यानंतर मानवे यांनी स्वतःच्या नावाची म्हणजेच सुजाता दीपक मनवे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य पंचायत समिती यांच्या सौजन्याने अशी वाक्य असलेली पाटी ही ग्रामस्थांना अडचण होईल अशा रिकाम्या जागेत चौथरा तयार करून लावण्यात आली आहे.
सध्या याच चवथ्यार्याच्या नाम फलकावरून गावात वाद निर्माण झाला असून याची चर्चा सध्या नेरळ शहरभर पसरली आहे.पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या सुजाता मनवे यांच्या नावाची शहरभर सध्या चर्चा सुरू झाली आहे.त्यांनी केलेले रस्त्याचे काम हे एकीकडे तर कामाच्या नावाचे फलक हे दुसरीकडे लावण्यात आले असून हा फलक येथील स्थानिक नागरिकांना अडचणींचा विषय ठरल्याने याची सध्या शहरभर चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामस्थांना सांस्कृतिक,समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच बालबच्चे कंपनीला खेळण्यासाठी एकाच मोकळी जागा गावात शिल्लक असताना केवळ आपल्या नावाच्या पाटी साठी आग्रही भूमिका घेणार्या मनवे यांच्या बाबत आता स्थानिक प्रशासन व वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचं ठरणार आहे. तर या कामाचे अंदाजपत्रक मंजूर करणारे कर्जत पंचायत समितीचे शाखा अभियंता गुलाबराव देशमुख यांनी त्या कामाबाबत काहीही माहिती देण्यासाठी फोन उचलला नाही.
लोकप्रतिनिधींची अरेरावी
यासंदर्भात ग्रामस्थांनी सामंजस्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनवे यांच्याशी संपर्क साधला असता आरेरावीची भाषा वापरण्यात आली असून, चवथ्यारा हटवण्यास नकार दिला आहे.