बेपत्ता पतीमुळे वाढले गूढ; पोलिसांचा तपास सुरु
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रक्षा बंधनाच्या पवित्र दिवशी पेण शहरातील शिवाजी चौक येथे राहणार्या तरुण विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या महिलेचा नवरा देखील बेपत्ता झाला असल्याने आत्महत्येचे गूढ वाढले आहे.
पेण शहरातील शिवाजी चौक येथील एकता अपार्टमेंटमध्ये राहणार्या ऋतुजा रितेश गायकवाड (वय 22) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन रविवारी सकाळी आत्महत्या केली. महिलेने आत्महत्या केल्यापासून तिचा नवरा देखील बेपत्ता असल्याने या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. या प्रकरणी पेण पोलीस अधिक तपास करत आहेत.