| अलिबाग | प्रतिनिधी |
ओमकार क्रीडा मंडळाच्यावतीने साखरचौथ गणपतीचे औचित्य साधून रा. जि. प शाळा वेश्वी येथे शेतकरी कामगार पक्ष व ओमकार क्रिडा मंडळ वैश्वीआणि लायन्स हेल्थ फाउंडेशन तर्फ मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी (दि. 2) सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया चित्रलेखा पाटील व लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या मार्फत मोफत करण्यात येणार आहे. याशिवाय दुपारी 2 ते 6 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी केले आहे.