| उरण | वार्ताहर |
उरण पनवेल महामार्गावर रविवारी( 29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास पागोटे गावच्या हद्दीत बॉयलर कोंबड्या घेऊन उरणकडे येणार्या टेम्पोचा अपघात झाला आहे. सदर अपघात हा पुलावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिल्याने घडला आहे. यामध्ये टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिकन विक्रेते नरेश भोईर यांच्या मालकीच्या टेम्पोमधून बॉयलर चिकन कोंबड्यांची वाहतूक नेहमीच केली आहे. पहाटे कोंबड्या घेऊन उरणला परतत असताना पागोटे गावाजवळील पुलावर उभा असलेल्या ट्रेलरवर टेम्पो धडकला. ही धडक एवढी भीषण होती की गाडी ही पूर्णपणे नादुरुस्त झाला. यामध्ये टेम्पो चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे 10 ते 12 लाखांचे नुकसान झाल्याचे मालक नरेश भोईर यांनी सांगितले.