राज्य समन्वयक डॉ.सुनिल पाटील यांची माहिती; मराठा बांधवांना लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
खोपोली | प्रतिनिधी |
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीचासरकारला 24 डिसेंबर पर्यतचा अल्टिमेटम देत मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे.जरांगे पाटील यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर रायगड दौऱ्यावर येणार असून खोपोलीत 20 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित केली आहे.
जाहिर सभेसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ.सुनिल पाटील यांनी देत मराठा बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहण्याचे आवाहनही पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
याप्रसंगी सकल मराठा समाज रायगड जिल्ह्यातील राज्य समन्वयक माजी नगराध्यक्ष डॉ.सुनिल पाटील,विनोद साबळे (पनवेल),उत्तम भोईर,उल्हासराव देशमुख, शंकरराव थोरवे,गणेश कडू,राजेश लाड,मधुकर घारे,मंगेश दळवी,रमेश जाधव,अमोल जाधव,राहुल गायकवाड,तात्या रिठे यांच्यासह खोपोलीतील माजी नगरसेवक,मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.