नागोठणे पोलिस ठाण्यात कर्तबगार महिलांचा सन्मान
| नागोठणे | प्रतिनिधी |
रायगड पोलिस दलातील पोलिस अंमलदार सचिन भोईर यांची कन्या यशस्वी गायिका, नागोठणे येथील रहिवासी कु.स्वरा भोईर हिला नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि.हरेश काळसेकर यांनी प्रतिकात्मक स्वरूपात प्रभारी पोलिस अधिकारी म्हणून काही काळ आपल्या खुर्ची मध्ये बसवून तिचा सन्मान करत तिचे धैर्य बळ वाढविले. या कार्यक्रमात प्रजापिता ब्रम्हकुमारी अध्यात्मिक केंद्राच्या पुनम दीदी यांनी अध्यात्मिक मार्गदर्शन केले.
स्मरण त्यागाचे.. स्मरण शौर्याचे.. स्मरण ध्येयाचे.. स्मरण स्त्री पर्वाचे..फफ या वाक्याप्रमाणे सर्व आदिशक्तींचा सन्मान करणे आपले आद्य कर्तव्य समजून नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी शुक्रवारी (दि.8) मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा कृतज्ञता सोहळा हा कार्यक्रम आयोजित आला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून उपस्थित विविध क्षेत्रातील महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नागोठणे शहर व परिसरातील सुमारे 90 पेक्षा अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची उंची वाढविली.
नागोठणे पोलिस ठाण्याचे आवारात जागतिक महिला दिनानिमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी सपोनि हरेश काळसेकर यांनी नागोठणे पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांना संपूर्ण दिवस कार्यमुक्त ठेवून खऱ्या अर्थाने आपल्या ठाण्यातील महिलांचा यथोचित सन्मान केला.याचबरोबरीने पोलिस ठाणे हद्दीतील गावांतील महिला पोलिस पाटील भगिनी, महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी व सदस्या तसेच विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून यथोचित सन्मान यावेळी सपोनि. हरेश काळसेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नागोठणे नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच सुप्रियाताई महाडिक, वरवठणे सरपंच ऋतुजाताई म्हात्रे, झोतीरपाडा सरपंच प्रीतीताई कुथे, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर विभागातील प्रमुख वरदा कुलकर्णी, पुनम दीदी, कल्पना टके, सुजाता जवके, निलोफर पानसरे, श्रेया कुंटे, शीतल नांगरे, पुनम काळे, आरती महाडिक, पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलिस हवालदार विनोद पाटील, महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी व सदस्या, महिला पोलिस कर्मचारी महिला सहा.फौजदार राजश्री टिवरे, दया पाटील, संजिता सानप, सारिका म्हात्रे, मनिषा लांगी, ज्योती भोईर, प्रतिक्षा गायकवाड, मयुरी पाटील, नम्रता आयर यांच्यासह पोलिस ठाण्याचे हद्दीतील महिला पोलिस पाटील तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.