। खालापूर । वार्ताहर ।
ताकई,ता.खालापूर येथील टँकर अज्ञातानी चोरून नेल्याची घटना घडली. दि.9 ते 10 नोव्हेंबर च्या दरम्यान एकूण 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा लाल रंगाचा टॅकर (.एमएच-04/सीए/8803 )हा मौजे ताकई येथील सुनिल पाटील यांच्या बोअरवेल जवळुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी रा.चिंचवली, गोहे, ताकई, ता.खालापूर यांचे परवानगीशिवाय स्वत:चे अवाजवी व आर्थिक फायदा करुन घेण्याच्या उददेशाने, लबाडीच्या इरादयाने मौजे ताकई, ता.खालापूर येथुन चोरुन नेला.